What is Dysphagia?
गिळण्या संबंधीचे विकार अथवा दोष (डिस्फाजिया) म्हणजेकाय ?
पक्षाघात ( स्ट्रोक ) किंवा मेंदुला ईजा झालेल्या रूग्णांमध्ये गिळण्याचा त्रास (डिस्फाजिया) ही एक सामान्य समस्या असते. ह्या त्रासाची प्राथमिक कारणे किंवा लक्षणे अशी असू शकतात की:
- तोंडामध्ये संवेदना कमी होणे
- अन्नपचनात सहभागी होणार्या स्नायुंमध्ये अशक्तपणा येणे
- चावण्याच्या व गिळण्याच्या प्रक्रियेत ताळमेळ किंवा संतुलन नसणे
या कारणांमुळे सहसा द्रवपदार्थ, अन्नकण, किंवा कठिणपदार्थ अन्ननलिकेत न जाता श्वासनलिकेत जातात व ह्यालाच "ऍस्पिरेशन"
म्हणतात . पाणी,अन्नाचे कण, कफ़ , वगैरे श्वसन नलिकेद्वारेफुफ़्फ़ुसात जाणे ही काळजी कारक बाब आहे . ह्यामुळे न्युमोनिया किंवा छातीचे संसर्गजन्य रोग होण्याची दाट शकयता असते, याचा वेळेत
उपचार केला नाही तर हे प्राणघातक ठरु शकते. डीस्फाजिया शी निगडीत अशी अजून हि काही
कठीण समस्या आहेत जसे कुपोषण, शरीरात पाण्याची कमतरता किंवा डीहायड्रेशन , काही कारण नसताना वजन कमी होणे ,
भूक मंदावणे,इत्यादी.