Types of Stroke
पक्षाघात / स्ट्रोकचे प्रकार
१. एम्बोलिक
२. थ्रोम्बोटिक
३. रक्तस्त्राव हीमो-हेजीक
Embolic Stroke
१. एम्बोलिक
एम्बोलिक पक्षाघात मेंदूपर्यंत पोहोचविणाऱ्या धमनीतील रक्ताची गाठ एखाद्या धमनीत अडकल्यावर मेंदूपर्यंत होणारा रक्ताचा प्रवाह थांबवतो. ही रक्तगाठ सामान्यत: हृदयापासून येते किंवा धमनीमध्ये जमा असलेल्या चरबीचा तुटलेला एक अंश असते.
Thrombotic Stroke
२. थ्रोम्बोटीक
थ्रोम्बोटीक पक्षाघात ह्या प्रकारात धमनीच्या आतल्या बाजूस रक्ताच्या गाठी जमा झाल्याने रक्ताचा प्रवाह कमी होतो किंवा पूर्णपणे थांबतो आणि मग रक्तातल्या ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मेंदूच्या प्रभावित भागातील पेशी मरायला लागतात. ह्या पक्षाघाताचे नाव थ्रोम्बोटीक आहे कारण रक्तप्रवाह थांबवणाऱ्या गाठीला थ्रोम्बोटीक म्हणतात.
Hemorrhagic Stroke
३. रक्तस्त्राव (हीमोऱ्हेजीक)
या प्रकारच्या पक्षाघातात मेंदूची धमनी फुटते आणि त्यातून निघणाऱ्या रक्ताच्या दाबामुळे आणि कमी ऑक्सिजनमुळे काही पेशी मरण पावतात. मेंदूच्या रक्तस्त्रावाची खूप कारणे असू शकतात पण त्याची मुख्य दोन कारणे आहेत. बऱ्याच वेळेपासून होणाऱ्या उच्च रक्तदाबामुळे किंवा अन्युरिज्म फुटणे. अन्युरिज्ममध्ये एका धमनीचा कमजोर भाग हळूहळू मोठा होऊन फुग्यासारखा फ़ुगतो.
अन्युरिज्म हे साधारणत: जन्माच्या वेळेपासून होते किंवा काही वर्षांनी वाढत जाते. अन्युरिज्म ह्या एका समस्याचे कारण तोपर्यंत काळात नाही जोपर्यंत ते खूप वाढत नाही किंवा वाढून फुटत नाही.
Thrombotic Stroke ani
Hemorrhagic Stroke ani