Does aphasia affect a person's intelligence?
वाचाघात किंवा अफेजिया झाल्यामुळे व्यक्तिच्या बौद्धिक क्षमतेवर परिणाम होतो का ?
नाही , ज्या व्यक्तिला अफेजिया झाला आहे त्याला भाषा समजण्यास व वापरण्यास तसेच शब्द आठवण्यास समस्या येते व कार्यक्षमता कमी होते . परंतु व्यक्तिचि बुद्धिमत्ता (उदा . विचार करण्याची क्षमता , आठवण्याची क्षमता , एखाद्या क्रियेत भाग घेण्याची आणि लक्षात ठेवण्याची क्षमता ) शक्यत: अबाधित राहते . ज्या व्यक्तिला अफेजिया झालेला असतो त्यास संभाषण करताना समस्या येतात तसेच काही जणांची भाषा पूर्ण बाधित असते म्हणून चुकून त्यांना मतिमंद समजले जाते .