Dysphagia Treatment
स्वलोवींग थेरपी / गीळण्या संबधी दोषावरिल उपचार
गिळण्या संबधी आवश्यक तपासणी केल्यानंतर फीडिंग / गिळण्या संबंधी उपचार योजना स्पिच
स्वलोविंग थेरपिस्ट व अन्य तज्ञ डॉक्टर ठरवतात:
- रुग्णास कुठ्ल्याप्रकारचे ,किती मऊ / पातळ अन्न पदार्थ दिले पाहिजे
- कशा प्रकारे कशा शारीरिक स्थिती मध्ये /पोसिशन मध्ये दिले जावे
- रुग्णाला आणि कुटुंबियांना ओरोमोटर एक्सरसाईझेस व्यायाम/
उपयोजना आणि या क्रियेत होणाऱ्या अडचणी / प्रगती काळात काय करणे अथवा टाळणे किंवा काय खाण्यापिण्यास द्यावे किंवा देऊ
नये हे समजावले जाते.
- आवश्यकतपासणीनंतर रुग्णाला योग्य व्यायाम - ओरोमोटर एक्सरसाईझेस ,मुखातून अन्न गिळ्ण्य़ाच्या क्रियेत सहभागी होणारे
अवयव-तोंड घसा,इत्यादी स्नायू, त्यांची संवेदनशीलता वाढवण्यासाठीउपयोगी मनुवर्स /योग्य व्यायामनिश्चित केले जातात. - गिळण्याची समस्या गंभीर असेल आणि रुग्णाला तोडांने आहार घेण्यास त्रास होत असल्यास किंवा खूप दिवस लागत असल्यास NG (नेझोग्रास्ट्रीक ट्यूब ) किंवा G ट्यूब लावून रुग्णास आहार दिला जातो.
- NG ट्यूब / नेझोग्रास्ट्रीक ट्यूब नाकाद्वारे पोटापर्यत जाणारी प्लास्टीक ट्यूब असते. ज्याद्वारे पाणी ज्यूस, पेज,
दुध असे द्रवपदार्थ दिले जातात. हि डॉक्टरांनाकिंवा नर्सला सहजरीत्याटाकतायेते. - सर्जिकल/शस्त्रक्रिया करून गिळण्य़ासंबंधी उपचार जसे Gastrostomy जी ( G ) अथवा पेग ट्यूब ( PEG ट्यूब) हि अशा रुग्णांना बसवतात ज्यांना\अस्पिरेशन न्युमोनिया होण्याची दाटशक्यता /धोका आहेत (अतिदक्षता विभागातील रुग्ण ज्यांना स्मृतीदोष/डिमेंशिया आहे, अशक्तपणा /बेशुद्धी / किंवा इतर चिंताजनक रोग /बाबी आहेत). पेग /जी ट्यूब द्वारे एक छोटस छिद्रनळी बसवून थेटपोटात पातळ अन्नपदार्थ जातात. रुग्णाच्या आरोग्यात जशी प्रगती दिसते तसेत्यांना वाचा भाषा गिळण्या संबंधी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली स्वोलोव्हिग थेरपीत तोडांद्वारेहि अन्न दिले जाऊ शकते.
- ही एक तात्पुरती योजना असते ,रुग्ण पूर्णपणे बिनधोक गिळण्यास सक्षम झाल्यावर सहजपणे ट्यूब काढता येते.
- NG (नेझोग्रास्ट्रीक ट्यूब) किंवा ट्यूब असताना डॉक्टरांनी/ वाचा तज्ञांनी
सागीताल्याशिवाय काहीही तोडांद्वारे देऊ नये.