What Should the Family Avoid Doing ?
कुटुंबाने काय करणे टाळावे?
१. रुग्णाची कीव करू नये. त्यामुळे तो / ती आपला आत्मविश्वास गमावू शकते.
२. रुग्णाने सांगितल्याखेरीज त्याच्यातर्फे बोलणे किंवा उत्तरे देवू नयेत.
३. जर प्रतिसाद नाही मिळाला तर योग्य शब्द सुचविण्याची घाई करू नये. मदत फक्त निराशा कमी करण्याइतकीच करावी.
४. रुग्णाला ज्या गोष्टी करायला अवघड जातात त्या गोष्टी करायला सांगू नये किंवा भाग पाडू नये.
५. रुग्णाकडून बोलताना चुकीच्या वाक्यरचना किंवा शब्दप्रयोग केला गेला तरी योग्य वाक्यरचना, शब्दप्रयोगाचा वापर झालाच पाहिजे असा आग्रह धरू नये. त्यामुळे रुग्णाला वैफ़ल्य / निराशा येण्याची शक्यता असते.
६. रुग्ण निरनिराळ्या पद्धतीने बोलण्याचा किंवा भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करल असल्यास (हातवारे, हावभाव, लेखी इ.) त्याला अडवू नये.
७. रुग्णाला बरी होण्याची खोटी आशा दाखवू नये. रुग्णांना आदराने वागवल्याने, त्यांच्यातील दोष न दाखवल्याने व त्यांना स्वावलंबी होण्यास प्रोत्साहन दिल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल.
८. रुग्णाला नातेवाईक अथवा मित्र - मैत्रिणी पासून लांब ठेऊ नये.
९. रुग्ण त्याच्या भावना दर्शविण्यासाठी सहजरित्या रडत असेल तर त्याला थांबवू नये.
१०. दुसऱ्या व्यक्तीबरोबर संभाषण करत असताना रुग्णाकडे दुर्लक्ष करू नये.