What is Primary Progressive Aphasia (PPA)
प्रायमरी प्रोग्रेसिव्ह अफेजिया (पी. पी. ए.)
प्रायमरी प्रोग्रेसिव्ह अफेजिया (पी. पी. ए.) हा वाचा भाषेचा वाढत जाणारा मेंदूचा आजार आहे. याची सुरुवात विचरशक्तीमधील सूक्ष्म बदलाने आणि मेंदूच्या पेशीच्या हळूहळू ऱ्हास होण्याने होतो. सुरुवातीला बहुतेक रुग्णांमध्ये सामान्यांसारखी (लक्ष, स्मरणशक्ती, कारणमिमांसा, विचारशक्ती) कार्यक्षमता दिसून येते. या रुग्णांमध्ये दैनंदिन कार्य करण्याची क्षमता अबाधित राहते. पी. पी. ए.चे प्राथमिक लक्षण म्हणजे आठवण्यात किंवा सामान्य शब्द निवडून सहजपणे बोलण्यात अडचण येते. जसा आजार वाढत जातो तशी बौद्धिक, स्मृतीक्षमता ढासळते आणि रुग्णाला भाषेचा वापर करण्यामध्ये अडचण येते आणि बोलण्याची क्षमता कुठे कमी पडते हे दाखवता येत नाही. साधारणतः पी. पी. ए. हा ५५ - ६५ वर्षे वयाच्या रुग्णांमध्ये सुरुवातीला आढळून येतो. तो काही वृद्धांमध्येसुद्धा दिसून येतो.
पी. पी. ए. असलेल्या रुग्णांमध्ये खालील लक्षणे आढळून येतात.
* सहज व स्पष्ट शब्द उच्चारण्यात अडथळा आणि वाचाशक्ती कमी होत जाणे.
* शब्द आठवण्यामध्ये आणि व्यक्तीची नावे सांगण्यात अडचण येणे.
* बोलण्यात आणि समजण्यात अडचण येणे.
* लिहिण्यात आणि लेखी भाषा समजण्यात अडचण येणे.
पी. पी. ए. होण्यामागे काही एक कारण नाहि. वास्तवात याचा संबंध मेंदूचे विविध आजार, अल्झायमर्स, डिमेन्शया तसेच पिक नामक (किंवा फ्रोन्टो टेम्पोरल डिजनरेशन / FTLD / FTD )
आजार याचाशी आहे.