Who acquires Aphasia ?
वाचाघात किंवा अफेजिया कोणाकोणाला होऊ शकतो ?
अफेजिया आणि पक्षाघात हा वय , जात , लिंग किंवा शारीरिक बांध्यास अपवाद नाही . त्याचप्रमाणे शाकाहार / मांसाहार या दोन्ही आहार पद्धती असणाऱ्यांमध्ये पक्षाघात होण्याची शक्यता असते . तसेच त्याच्यामध्ये अफेजिया होण्याचीही सारखीच शक्यता असते . उच्च रक्तदाब , मधुमेह व शारीरिक शिथिलपणा / स्थुलपणा , अति धुम्रपान आणि मद्यपान व्यसने , इ. असणाऱ्या लोकांना पक्षाघात आणि अफेजिया होण्याची शक्यता जास्त असते .