Symptoms of Dysphagia
डीस्फाजियाची / गिळण्या संबंधी विकाराची लक्षणे
- जेवताना किंवा पाणीपिताना किंवा नंतर ठसका लागणे /खोकला येणे
- अन्न व्यवस्थित चावण्यास त्रास / जास्त वेळ लागणे, घास मागे ढकलण्यास कठीणता
- तोंडातून घास ,पाणी ,अन्नकण / लाळ पडणे
- खाल्ल्यानंतरही तोंडात किंवा थोड मागे अन्नकण राहणे
- पाणी पिल्यानंतर आवाज बदलणे / गर्गली आवाज होणे /डोळ्यातून पाणी येणे
- मायक्रो ऍस्पिरेशन किंवा थोडे थोडे अन्न पाणी इ . श्वासनलिकेत नेहमी जाऊन फुफ्फुसाचे संसर्गजन्य रोग होणे ( इन्फेक्शन )/
- वरचेवर न बरा होणारा बारीक ताप ,खोकला / किवा खोकला न होता अन्नकण,लाळ इ. श्वासनलिकेत जाणे ( सायलण्ट ऍस्पिरेशन)
जर मेंदूला इजा झाल्यानंतर किंवा पक्षघातानंतर, तुमच्या परिवारातील कुठल्याही सदस्याला याप्रकारची लक्षणे दिसली तर
गिळण्यासंबंधीच्या वाचा भाषा तज्ञ, कान नाक घसा तज्ञ डॉक्टरांना भेटून गिळण्यासंबंधीची तपासणी व आवश्यक उपचार करून घेणे.