Importance of Early Treatment
तत्कालीन उपचाराचे महत्व :
पक्षाघातानंतरचा लगेचचा काळ इलाजाच्या दृष्टीने खूप महत्वाचा असतो . पक्षाघातामुळे आलेल्या ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे प्रभावित मेंदूच्या पेशी लगेच मरत नाहीत. सर्व प्रथम केंद्रस्थानी असलेल्या पेशींचा ऱ्हास होतो . ज्या पेशी मुख्य भागाच्या आजूबाजूस असतात त्या सुस्त पडतात व असे भासते की त्या पेशी ऱ्हास झाल्या आहेत पण जखमी झाल्यानंतर त्या जवळ जवळ वीस मिनिटांपर्यंत काम करू शकतात जर ६ - ८ तासांत धमन्यामध्ये रक्तप्रवाह परत सुरु झाला तर मेंदूच्या पेशींना मरण्यापासून वाचवले जाऊ शकते म्हणूनच पक्षाघाताच्या लगेचच नंतरचा काळ इलाजासाठी व आरोग्यासाठी खूप महत्वाचा असतो . कारण ह्या अवधीत धमन्यातील रक्ताचा प्रवाह परत चालू करून शारीरिक तथा वाचा भाषांसंबंधी हानी बऱ्याच प्रमाणात कमी केली जाऊ शकते अथवा टाळली जाऊ शकते.
म्हणून पक्षाघाताच्या रुग्णांना लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेणे गरजेचे आहे. ह्यामुळे रुग्ण उपलब्ध सेवांचा पुरेपूर लाभ घेऊ शकतात . ह्या विशेष इलाजाने रक्ताघाताची स्थिती अजून खराब होण्यापासून थांबवली जाऊ शकते व रुग्णाची शारीरिक, वाचिक आणि भाषिक क्षमता सुधारण्यात सहायता होते .