How the Family Should Help the Stroke Victim ?
स्ट्रोक / मेंदूचा पक्षाघात आलेल्या व्यक्तिस कुटूंबाने कशा प्रकारे मदत करावी ?
१. वाचाघात / रक्तस्त्रावाची संपूर्ण माहिती करुन घेणे.
२. रुग्ण कोणती गोष्ट करु शकतो किंवा काय करु शकत नाही, ह्याच्या मर्यादा स्विकारणे.
३. रुग्ण नेहमी डॉक्टरच्या (न्युरॉलॉजिस्ट - चेतासंस्थेच्या रोगावर उपचार करणारा तज्ञ ) देखरेखीखाली असावा, जर जवळ कोणी तज्ञ डॉक्टर नसेल तर जिल्हा रुग्णालयात किंवा ज्या दवाखान्यात अशा डॉक्टरची नियुक्ती असेल तिथे जाणे. काही दवाखान्यात पुनर्वसन केंद्राची सुविधा उपलब्ध असते.
४) फिजिकल, ऑक्युपेशनल व स्पीच थेरपी लवकरात लवकर सुरू करणे.
५ ) रुग्णाला जास्तीत जास्त बोलण्याची संधी देणे, आकडे मोजणे, आठवड्याचे वार सांगणे, नमस्ते, जय हिंद, या, बसा अशा सहज सोप्या आठवून बोलता येणार्या शब्दांचा वापर करुन घेणे.
६) त्यांनी केलेल्या लहान-सहान कृतीचे कौतुक करणे.
७) डॉक्टरांनी परवानगी दिल्यास त्यांना कौटुंबिक व सामाजिक कार्यक्रमात सहभागी करुण घेणे.
८) दैनंदिन नित्यक्रमांमध्ये त्यांना व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न केल्यास रुग्णाचा आपली कामे आपण करु शकतो हा आत्मविश्वास वाढतो.
९) रुग्णाला वरचेवर विश्रांती घेवू देणे. मेंदूचा पक्षाघात रक्तस्राव झालेल्या व्यक्ती विश्रांतीनंतर जास्त चांगल्या रितीने पुनर्वसन थेरपी कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात.
१०)रुग्ण परिवारातील जेष्ठ व्यक्ती असेल तर व्यक्तीस पुर्वीप्रमाणे सहभागी करण्याचा प्रयत्न करणॆ.
११) त्यांच्या सर्व गरजा लक्षात घ्याव्यात, या व्यक्तिंना आपले नातेवाईक किंवा मित्र-मैत्रिणींबरोबर पूर्वीप्रमाणे भेटणे अथवा बोलणे आवडेलच असे नाही, पण त्यांच्या इच्छेचा मान राखून त्यांना सामाजिक प्रवाहात हळू हळू येण्यास उद्य़ुक्त करावे.
१२) रुग्ण पुष्कळ वेळा अर्वाच्य अथवा अपशब्द वापरतात , ही एक आपोआप येणारी प्रतिक्रिया असते, त्यावर त्यांचा ताबा नसतो. या वागणुकीचा करमणूक किंवा राग न मानता स्वीकार करावा.
१३) जर रुग्ण अचानक विनाकारण रडू लागला तर फारसे लक्ष न देता विषय बदलावा.