Transient Ischemic Attack (TIA)
अल्पकालिक पक्षाघात (ट्रान्जीएंट इस्केमिक अटैक )
जर रक्तात वाहणारी गाठ फक्त काही काळासाठी धामनीतील रक्ताचा प्रवाह थांबवत असेल तर त्यास ट्रान्जीएंट इस्केमिक अटैक म्हणतात. ह्याची काही लक्षणे म्हणजे असंवेदनशीलता, बोलण्यात, चालण्यात ,शब्द चयन करण्यात व दिसण्यास त्रास तथा शारीरिक असंतुलन अस्थायी असतात. ही लक्षणे काही मिनिटात नाहीशी होतात व कधीकधी १० - १५ मिनिटापेक्षा जास्त वेळ राहत नाहीत.
ट्रान्जीएट इस्केमिक अटैक ह्याप्रति दुर्लक्ष करू नये. कारण त्याच्या लक्षणांमुळे कधीही पक्षाघात होऊ शकतो असा अंदाज लावला जातो की, ट्रान्जीएंट इस्केमिक अटैकनी ग्रस्त जवळजवळ ४० - ५० टक्के रुग्णांना २ - ६ महिन्यात पक्षाघाताचा एक झटका होऊ शकतो. म्हणूनच ट्रान्जीएंट इस्केमिक अटैकचा लागलीच तात्काळ इलाज करणे गरजेचे आहे.