Stroke Risk Factors
पक्षाघात / स्ट्रोकची कारणे
पक्षाघात कुठल्याही वयोगटातील स्त्री - पुरुष , कुठल्याही शारीरिक बांध्याच्या माणसांस होऊ शकतो. पक्षाघात होण्याची शक्यता त्या लोकांमध्ये जास्त असते ज्यांना उच्च रक्तदाब, रक्तात जास्त कोलेस्ट्रोल, मधुमेह, धूम्रपानाची सवय, ज्यांमध्ये पक्षाघाताची अनुवंशिकता दिसून येते.
पक्षाघात टाळण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आपल्या डॉक्टरबरोबर तुमच्याशी निगडीत पक्षाघाताच्या कारणांसंबंधी प्रतिबंधात्मक उपाययोजनेची चर्चा करणे.
पक्षाघाताची संभावना वाढण्याची दोन कारणे आहेत.
१) ज्यांचा इलाज आहे. २) ज्यांचा इलाज नाही.
ज्यांचा इलाज शक्य आहे अशांनी त्यांच्या राहणीमानात बदल करणे . यामुळे स्ट्रोक किंवा पक्षाघाताची शक्यता कमी करता येऊ शकते .
Controllable Risk Factors
पक्षाघाताचा इलाज किंवा उपचार असलेली कारणे :
* उच्च रक्तदाब
* हृदयविकार
* मधुमेह
* रक्तामध्ये जास्त कोलेस्ट्रोल
* रक्ताच्या गाठीमुळे धमन्या आकुंचन पावणे
* शारीरिक निष्क्रियता (राहणीमानासंबंधी ) किंवा शिथिलपणा
* धुम्रपान मद्यपान
Uncontrollable Risk Factors
पक्षाघाताचा इलाज किंवा उपचार नसलेली कारणे
* वय
* लिंगभेद
* जाती व वंशासंबंधीचे आजार
* हृदयविकार व पक्षाघाताची अनुवांशिक कारणे
* मागील हृदयविकाराचा झटका