Aphasia in Multiple Languages
द्विभाषिय किंवा बहुभाषिय व्यक्तींमध्ये अफेजिया किंवा वाचाघात
अफेजिया किंवा वाचाघातामध्ये व्यक्तीच्या समजण्याच्या आणि / किंवा बोलण्याच्या वाचाभाषा क्षमतेवर परिणाम होतो. तसेच पक्षाघात झालेल्या व्यक्तीच्या लिहीण्याच्या , वाचण्याच्या किंवा शब्द्चयनाच्या क्षमतेवर परिणाम दिसून येतो . दोन किंवा जास्त भाषा समजणाऱ्या , बोलणाऱ्या आणि / किंवा लिहिता वाचता येणाऱ्या ( द्विभाषिक / बहुभाषिक ) व्यक्तीमध्ये पक्षाघातानंतर विविध भाषेतील समजण्याची , बोलण्याची , वाचण्याची आणि लिहिण्याची क्षमता वेगवेगळ्या प्रमाणात बाधित होते . तसेच पक्षाघातानंतर दिसणारी विविध भाषेतील सुधारणा सारखीच असेल अस नाही . रुग्णाचे वैयाक्तिक , भौतालीक व भाषिक वातावरण आणि भाषेचे मानसिक महत्व हे घटक पक्षाघातानंतर भाषेवर होणाऱ्या परिणामासाठी आणि सुधारण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात .
पक्षाघात अफेजिया किंवा वाचाघातानंतर ज्या भाषेत रुग्णाला जास्तीत जास्त सुधारणा दिसून येते किंवा जी भाषा जास्त सोयीस्कर वाटते त्या भाषेत रुग्णाला संभाषण करण्यासाठी किंवा लिहिण्यासाठी प्रोत्साहित करावे .