Dysphagia Evaluation
गिळण्यासंबंधीच्या त्रासाची / दोषाची तपासणी
या तपासणीमध्ये अनेक विशेष तज्ञांचा समावेश असतो जसे कि, पारिवारिक चिकित्सक जनरल किंवा फ्यामिली डॉक्टर, वाचा भाषा
तज्ञ स्पीच स्वालोविंग थेरपिस्ट, कान नाक घसा तज्ञ, आहार तज्ञ/
डायटेशियन, रेडीय़ोलोजिस्ट, गीळण्याच्या त्रासामध्ये हे विशेष तज्ञ एक्सरे विडीओ फ्लोरोस्कोपी द्वारे बघतात की,
कसे अन्न तोडातुन अन्ननलिकेद्वारे पोटात जाते. गीळण्याच्या क्षमतेची तपासणी विना
एक्सरे पण केली जाते, ज्याला फीस इंडोस्कोपी म्हणतात. या तपासणीमध्ये बघितले जाते की:
- कुठल्या प्रकारचे अन्न (अति पातळ, खिरेइतक मऊसर,खिचडी प्रमाणे नरम/मऊ/किंवा घट्ट) खाणे सुरक्षित आहे . कशाप्रकारचे कठीण- घट्ट/सैलसर अन्न द्यावे कि नाही
- कुठल्या प्रकारचे अन्नपदाथ खाण्यास त्रासदायक आहेत व केवढा मोठा घास तोंडात एका वेळी
घेणे योग्य किंवा सुरक्षित आहे
- व्यवस्थीत व सुरक्षितपणे गिळण्यासाठी खाताना कुठली शारीरिक स्थिती योग्य आहे
- गिळताना स्वलोवींग थेरपिस्ट (SLP)ने दर्शवलेले खाण्यासंबंधी कोणते व्यायाम करावे किंवा घास गिळताना डोक\ मानेच्या
ठराविक स्थिती पोसिशन जसे हनुवटी छातीच्या दिशेने टेकवण्या चा प्रयत्न करणे आणि याच स्थितित मान टेकवून पाणी पिणे /
काहीही गिळणे अथवा नाही