Aphasia and Stroke Association of India
Letter to Support Job Search
अफेजिया आणि भारत स्ट्रोक असोसिएशन
महोदय,
अफेजिया किंवा वाचाघात आणि भारत स्ट्रोक असोसिएशनचा स्वयंसेवक म्हणून मी हे पत्र आपणास स्ट्रोक आलेल्या व्यक्तीस किंवा त्याच्या / तिच्या बायको किंवा नवरा यास उदरनिर्वाहासाठी योग्य रोजगार मिळवून देण्यासंबंधी मदत करावी यासाठी लिहित आहे.
स्ट्रोक / पक्षाघात हे साधारणतः व्यक्तीमध्ये व्यंगत्व आणण्याचे मुख्य कारण आहे. ज्यामध्ये रुग्णाच्या समजण्याच्या, बोलण्याच्या आणि लिहिण्या वाचण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. स्ट्रोक / पक्षाघातामुळे शारिरिक क्षमतेवरसुद्धा परिणाम होतो. उदा. चालणे किंवा बघणे. जर कुटुंबातील कमावत्या व्यक्तीस स्ट्रोक / पक्षाघात झाला तर कुटुंबासाठी ही धक्कादायक बाब असू शकते. मात्र, बहुतेक स्ट्रोक / पक्षाघात असलेले रुग्ण त्यांच्या परिसराबाबत जागरूक असतात. रुग्णाला दिलेली जबाबदारी किंवा कामाचे स्वरूप त्याच्या शारिरीक क्षमतेनुसार सोपवले तर तो किंवा ती प्रभावीपणे योगदान करू शकेल.
ज्या रीतीने आपण वृद्धांशी, अपंगांशी गरजुंशी वागतो त्यानुसार आपली नैतिक मुल्ये आणि संस्कार दिसून येतात.
मी आपणास विनंती करतो कि स्ट्रोक / पक्षाघात असलेल्या रुग्णास उदरनिर्वाहासाठी रोजगार मिळण्यास मदत करा किंवा तुम्ही रुग्णाच्या पत्नीस रोजगार मिळवून देण्याचा विचार करा.
आपली मदत रुग्णाच्या कुटुंबाची प्रतिष्ठा राखण्यास आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदतकारक ठरू शकेल.
धन्यवाद,
आपला आज्ञाधारक
सुभाष भटनागर,
Ph.D. CCC-SLP
subhash.bhatnagar@mu.edu